समुद्रपूर: नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या शिवणफळ येथील गुंजन पुरकेचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान
शिवणफळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी गुंजन पुरके हिने नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्याची दखल घेत ग्रामपंचायतीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवणफळ येथील शाळा परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख तथा उंदीरगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक अशोक आडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, अरुण शिंदे,पत्रकार गजाननभाऊ गारघाटे, ग्रामविकास अधिकारी किशोर जाधव आदी उपस्थित होते.