भिवंडी: भिवंडी-कोकणात FDA ची कारवाई; 12.42 कोटींचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त
FDA यांनी भिवंडी आणि कोकणात 12.42 कोटी रुपयांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त केला. मिसब्रँडेड तेल, एक्सपायर माल आणि अस्वच्छ साठा आढळल्याने परवाना निलंबित आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणासुदीत मोहीम अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे.