गोंदिया: समाधान शिबिरात HPV लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे डॉ. वाघमारे यांचे आवाहन
4.5k views | Gondia, Maharashtra | Mar 20, 2026 गोंदिया: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित तालुका स्तरीय 'समाधान शिबीर' नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम राबवून HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असून, पालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवाहन या प्रसंगी जिल्हा परिषद गोंदियाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.