जळगाव: नवीपेठेतील एसबीआय शाखेत एटीएमची बदली करून वृध्दाची फसवणूक; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये अनोळखी इसमाने एका ज्येष्ठ पेन्शनधारकाला बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ७०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.