नगर: माळीवाडा येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात
आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते महापूजा
आज अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय झाला आहे, अनेकजण पंढरीच्या वारीला गेले आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून अनेक दिंड्या अहिल्यानगर शहरातून पंढरपूरकडे मार्गस्त झाल्या. या दिंड्यांचे महानगरपालिकेच्यावतीने स्वागत करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच शहरातील सामाजिक संस्था, ग्रुप, दानशुरांनी या वारकर्यांची सेवा केली. आज आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरात धार्मिक विविध कार्यक्रम संपन्न झाले