Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

खुल्या राष्ट्रीय तायक्वान्दो स्पर्धेत मंद्रूपच्या खेळाडूंना २५ पदकांची घवघवीत कमाई...

पुणे येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या खुल्या राष्ट्रीय तायक्वान्दो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमी, मंद्रूप येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २५ पदके पटकावली. या यशामध्ये ९ सुवर्ण, ८ रौप्य व ८ कांस्य पदकांचा समावेश आहे. वडगाव शेरी (पुणे) येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन आर. बी. होरांगी अकॅडमी, पुणे यांनी केले होते. या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आदी राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. दक्षिण सोलापूर तायक्वान्दो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजनगटांत सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.
खुल्या राष्ट्रीय तायक्वान्दो स्पर्धेत मंद्रूपच्या खेळाडूंना २५ पदकांची घवघवीत कमाई... - Solapur South News