जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर मकोका लावा ,
बीड प्रहार विशेष
"Safe Food, Safe Maharashtra" मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात तेल रीपॅकिंग उद्योगांवर FDA ची मोठी धडक कारवाई केल्याने ऑईलमील धारकामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जनतेच्या आरोग्याशी हे ऑईलमील वाले खेळत असून यांच्यावर मकोका सारखी कारवाई करण्याची मागणी होत असून अश्या कठोर कारवाया झाल्यानंतर असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे सामान्य जनतेतून बोलले जाते .
बीड जिल्ह्यातील वडवणी,माजलगाव आणि बीड शहरातील एमआयडीसी भागात एफडीए ने चांगलाच कारवाईचा दणका दिला असून यामध्ये मेसर्स स्वागत ऑईल इंडस्ट्रीज, प्लॉट नं. 83, MIDC बीड, मेसर्स चरखा ऑईल मिल, प्लॉट नं. 52, MIDC बीड,मेसर्स जय हनुमान ट्रेडर्स, वडवणी, मे. जान्हवी कमर्शियल्स, जुना मोंढा, माजलगाव ,मे. विनायक ऑईल इंडस्ट्रीज, जुना मोंढा, माजलगाव या ऑईलमील चा समावेश असून अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या _Safe Food, Safe Maharashtra_ या विशेष मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात दिनांक 06 व 07 ऑगस्ट 2026 रोजी तेल रीपॅकिंग उद्योगांवर धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळेव सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये मेसर्स स्वागत ऑईल इंडस्ट्रीज, प्लॉट नं. 83, MIDC बीड - दि. 06/08/2026तपासणी दरम्यान खालील गंभीर अनियमितता आढळून आल्या:- Reused Tins चा मोठ्या प्रमाणावर वापर एकाच टाकीतील तेल "रिफाइंड" व "अल्ट्रा रिफाइंड" म्हणून छापून ग्राहकांची फसवणूक, परिसर अस्वच्छ, In-house Laboratory व COA उपलब्ध नाही, Technical व्यक्ती नाही, Food Grade प्रमाणपत्रे नाहीत, साठवण टाक्या अस्वच्छ, कामगारांचे Medical Certificate व Pest Control रेकॉर्ड नाही
संशयित निकृष्ट दर्जाचा एकूण 66,652.6 किलो खाद्यतेल किमत रु. 1,05,85,236/जप्त करण्यात आला. त्यात रिफाइंड सोयाबीन, पाम तेल व स्वागत गोल्ड, गुडलुक, स्वस्तिक ब्रँडचा पॅक तेल समाविष्ट आहे. 10 Enforcement नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. परवाना देखील रद्द करण्यात आला आहे व आस्थापना तात्काळ बंद करण्यात आली.तसेच मेसर्स चरखा ऑईल मिल, प्लॉट नं. 52, MIDC बीड या ठिकाणी - दि. 06/08/2026 तपासणी दरम्यान वरीलप्रमाणेच Reused Tins, लेबलिंगमध्ये फसवणूक, अस्वच्छता, COA/लॅब/रेकॉर्डचा अभाव आढळला. एकूण 45,995.7 किलो खाद्यतेल किमत रु. 78,22,050/जप्त. त्यात रिफाइंड सोयाबीन, पाल्मोलिन, राईस ब्रान व शुभम, अनुज ड्रॉप, शुभम अल्ट्रा ब्रँडचा समावेश.
व 11 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले. व परवाना रद्द करून आस्थापना बंद करण्यात आली.
मेसर्स जय हनुमान ट्रेडर्स, वडवणी, जि. बीड - दि. 07/08/2026 याठिकाणीअस्वच्छ परिसर, Reused Tins, लॅब/COA/मेडिकल प्रमाणपत्र/पेस्ट कंट्रोल रेकॉर्डचा अभाव आढळला. एकूण 4,545.2 किलो खाद्यतेल किमत रु. 7,24,596/ जप्त. त्यात सोहम ब्रँड पाल्मोलिन व खुले सोयाबीन, पाल्मोलिन तेलाचा समावेश. 3 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले व परवाना रद्द करून आस्थापना बंद करण्यात आल मे. जान्हवी कमर्शियल्स, जुना मोंढा, माजलगाव - दि. 07/08/2026बॅच नंबर/लेबल नसले सुट्टे तेल असुरक्षितरित्या साठवले आढळले. एकूण 1,746 किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल* किमत रु. 2,79,360/ जप्त. 2 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले. License Forthwith Suspendedकरून आस्थापना बंद करण्यात आली मे. विनायक ऑईल इंडस्ट्रीज, जुना मोंढा, माजलगाव - दि. 07/08/2026वरीलप्रमाणेच Reused Tins, अस्वच्छता, COA/रेकॉर्डचा अभाव.248 किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल किमत रु. 39,680/ जप्त.
Enforcement नमुना तपासणीसाठी पाठवला.
License Forthwith Suspendedकरून आस्थापना बंद करण्यात आली.अश्या विविध बेधडक कारवायांमध्ये एकूण जप्तीचा आकडा सुमारे 1,19,187.5 किलो खाद्यतेल, किमत रु.1,94,50,922/ असा असून सदरील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. घोपे, मूळे, अजय गाढे, ठोंबरे, खंदारे, खाडे, गणेश दत्तू, रोहित फांदी, अंकुश नरवडे, सिद्धांत खंदारे, बोचरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली .