ठाण्यातील बाप्पाच्या देखाव्यात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा; उलगडला ‘दादा’चा राजकीय प्रवास!
विमान अपघातापासून ‘देवगिरी’ निवासस्थानापर्यंत; गुलाबी जॅकेट, गाजलेल्या सभा आणि मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाची ‘रिकामी खुर्ची’ देखाव्याचे ठरले आकर्षण
ठाण्यातील कळवा परिसरात घरगुती गणपतीच्या देखाव्यात दिवंगत अजित पवार यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. पत्रकार शुभम कोळी यांच्या घरातील बाप्पाच्या देखाव्यात अजित पवार यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे टप्पे आणि त्यांच्या कार्यशैलीशी जोडलेल्या आठवणी प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.
या देखाव्यात अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना, तसेच अनेक वर्षे राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचे केंद्र राहिलेल्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचे प्रतीक
Kalyan, Thane | Sep 17, 2026