प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकांचा सन्मान
789 views | Gondiya, Gondia | Mar 12, 2026 महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी HPV लसीकरण मोहिमेअंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे १० मुलींचे यशस्वी लसीकरण करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांची प्रमुख उपस्थिती होती.