Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

रत्नागिरी पोलीसांची २६ तासांची युद्धपातळीवरील शोधमोहीम गणपतीपुळे समुद्रकिनारी छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत शोधमोहीम व बचावकार्य सुरू केले. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस, भारतीय तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट श्री. नायर , सागरी सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील तसेच स्थानिक मच्छीमार बांधव यांच्या समन्वयाने समुद्रात व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली. प्रतिकूल हवामान, भरती-ओहोटी आणि समुद्रातील वेगवान प्रवाह यांसारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही शोध व बचावकार्य अखंडपणे सुरू ठेवण्यात आले. सुमारे २६ तासांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धपातळीवरील शोधमोहीमेदरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शोध व बचावकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच रत्नागिरी पोलीस दलाचे अधिकारी, अंमलदार, भारतीय तटरक्षक दल व स्थानिक मच्छीमार बांधव यांनी अथक परिश्रम घेत शोधकार्य सुरू ठेवले. अखेर सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून छत्रपती संभाजीनगर येथील पाचही तरुण हे मृत अवस्थेत आढळून आले. छत्रपती संभाजीनगर येथील पाचही तरुणांना रत्नागिरी पोलीस दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐 CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice #coastguard

Ratnagiri, Maharashtra | Jun 22, 2026