मोताळा: शहरातील शिवाजी महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त चर्चासत्र
शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलढाणा व शिवाजी महाविद्यालय मोताळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्राद्वारे ग्रामीण विकास या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.