आज दिनांक एक जानेवारीला सकाळी नऊ वाजता खोपडा येथील न्यू नवयुवक भीम ज्योती मंडळाचे वतीने, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन धुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल पुंजारामजी मेटकर, पत्रकार सोमेश्वर शहाणे यांचे सह खोपडा येथील पोलीस पाटील सुरेखाताई पाटील उपस्थित होत्या. गावकरी तथा महिला मंडळीची देखील उपस्थिती असल्याचे दिसून आले