नागपूर शहर: वाठोडा बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी गजाआड; विनायक गोल्हे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 9 जुलैला दुपारी 4:30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण रूपरावजी धांडे याला गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. धामणगाव रेल्वे येथील बोरगाव येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक व