नागपूर ग्रामीण: बीड जिल्ह्यातून आरोपी जेरबंद: नागपूरच्या बेलतरोडी येथील जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपीला अटक
नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील एका मुख्य फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने बीड जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. दिपक कृष्णा आटपळे (वय २१, रा. माटेगांव, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.