तिरंगा यात्रेनंतर आता भारत जिंदाबाद यात्रा आरपीआय आठवले गटाकडून
आज दिनांक 21 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास प्रसार माध्यमांशी बोलताना आरपीआय आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले सिंदूर आपरेशन मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ सध्या देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर येत्या 22 मे ते 6 जून दरम्यान आर पी आय आठवले गटाकडून भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.