सेलू: मोरेगाव रस्त्यावरील आखाडा हॉटेलमध्ये दोन कामगारांमध्ये राडा; एकाने दुसऱ्यावर केले चाकूने वार, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Sailu, Parbhani | Jan 24, 2024 मोरेगाव रस्त्यावर असलेल्या आखाडा हॉटेलमध्ये दोन कामगारांमध्ये झालेल्या राड्यात एका कामगाराने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार करत त्यास गंभीर जखमी केले. २२ जानेवारीला पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जखमी कामगारास पुढील उपचारासाठी परभणीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हॉटेल चालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सेलू पोलीस ठाण्यात आरोपी आकाश झंवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.