नागपूर शहर: एस.के.बारमध्ये उलटी साफ करण्याचा वाद गेला विकोपाला, डोक्यात फोडल्या दारुच्या बाटल्या; थरारक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका नामांकित 'एस. के. बार' मध्ये मध्यरात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.