यवतमाळ: आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते प्रभाग क्र. 5 मध्ये विकास कामाचे भूमिपूजन
यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. ५ मध्ये श्री. चिद्दरवार यांचे घरापासून ते श्री. चव्हाण व श्री. खेडेकर यांचे घरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे ₹३६,३४,२१५/- किंमतीच्या विकासकामाचे भूमिपूजन आज दि. ०६-०७-२०२५ रोजी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.