मुळशीत दरड कोसळून गौशाळेचे मोठे नुकसान! 8 गाईंचा मृत्यू, मदतीचे आवाहन
मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील राधा चैतन्य गौशाळेवर दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पहाटे सुमारे 2.30 वाजता घडलेल्या या दुर्घटनेत 8 गाईंचा मृत्यू झाला असून गौशाळेचा मोठा भाग मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला.
दरड कोसळल्याने गौशाळेची भिंत तुटली, मोठ्या प्रमाणात माती व दगड आत शिरले आणि गाईंसाठी साठवलेला चारा देखील वाहून गेला. सुदैवाने, गौशाळेतील उर्वरित गाई, वासरे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
गेली 15 वर्षे ह.भ.प. सचिन महाराज गुरव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून या गौशाळेत 100 ते 125 गाई-वासरांचे संगोपन केले जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीनंतर गौशाळेच्या पुनर्बांधणीसाठी आणि जनावरांच्या संगोपनासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
#Mulshi #Pune #Gaushala #Landslide #HeavyRain #MaharashtraNews #BreakingNews
Pune City, Pune | Jul 10, 2026