समुद्रपूर: गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने धूलिवंदन निमीत्त काढण्यात आली शांतता रामधून
गिरड येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ गिरड च्या वतीने अभिनव धुलिवंदन शांतता रामधून व धुलिवंदन सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी गुरुदेव प्रार्थना मंदिर इथून रामधुनीला सुरुवात करण्यात आली गावातील प्रमुख मार्गाने शांतता रामधून काढून होळीच्या सणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले रामधुनी नंतर श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे अभिनव धुलिवंदन कार्यक्रम पार पडला.