समुद्रपूर: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे : तहसीलदार कपिल हाटकर
समुद्रपुर तालुका पत्रकार संघ,समुद्रपुर नागरी सत्कार समिती व मित्र परिवाराच्या वतीने माजी ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या निरोप समारंभा प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार कपिल हाटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त ठाणेदार रविद्र रेवतकर, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ मॅडमवार, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाबाराव थुटे, जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे,माजी सरपंच रमेश भोयर, सन्नी पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार कपिल हाटकर यांनी आपले मत व्यक्त केले.