समुद्रपूर: तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी : तहसीलदार कपिल हाटकर
समुद्रपुर:शासनाच्या वतीने शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनां सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ फार्म आयडी काढून द्यावे असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे.शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना यासह केंद्र व राज्य सरकारच्या अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ पिक विमा योजना यांच्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना आपल्या शेताचा ७/१२ आपल्या आधार कार्डशी सल्गन करणे गरजेचे आहे. असे आवाहन तहसीलदार हाटकर यांनी केले आहे.