राजुरा विधानसभा क्षेत्रातील इरई (बोरगांव) येथील जि.प.प्राथ. शाळेत आज.३ नोव्हेंबर ला १२ वाजता नवीन वर्गखोली इमारतीचे भूमिपूजन आ. भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी सोई सुविधायुक्त सुसज्ज वर्ग खोली असणे आवश्यक आहे. या नवीन वर्गखोलीच्या भूमिपूजनामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोली मिळणार असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोईचे होईल.असे आ भोंगळे म्हणाले.