नागपूर शहर: नंदनवन हादरले! संपत्तीच्या वादातून माय-लेकीची एकाच वेळी आत्महत्या; नातेवाईकाने केला धक्कादायक खुलासा
नंदनवन परिसरात एका सधन कुटुंबातील आई आणि मुलीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे हा शेती आणि मालमत्तेसाठी पत्नी व सासूशी वारंवार वाद घालत होता. ३० एप्रिलच्या रात्री झालेल्या मोठ्या वादानंतर मानसिक तणावातून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.