रोहा: रायगड ताम्हीणी घाटातील निसर्ग सौंदर्य धबधब्याने खुलले, मनाई आदेश असतानाही पर्यटकांची गर्दी.
Roha, Raigad | Jun 24, 2025 गेल्या आठवड्यापासून मुसळधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ताम्हणी घाटातील उंच डोंगरावर हिरवी शाल पांघरायला सुरुवात झाली आहे. उंच सखल भागाकडून कोसळणारे फेसाळ धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असल्याने मंगळवारी 24 जून रोजी दु. 3 वाजता पर्यटकांनी ताम्हिणी घाटात धबधब्यावर मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्यातील जोखमी असणाऱ्या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना 30 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश असताना सुद्धा पर्यटक दिसत आहेत.