शिरपूर: मेंढ्यांबाबत विचारणा केल्याने महिलेला व मुलाला मारहाण;पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा,तालुक्यातील निमझरी येथील घटना
Shirpur, Dhule | Oct 4, 2025 शिरपूर तालुक्यातील निमझरी गावात 35 वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला तिचा पती व कुटुंबियांकडून मारहाण झाल्याची घटना 3 ऑक्टोबर घडली आहे.या प्रकरणी महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर महिलेस उसनवारीच्या पैशातून गहाण ठेवलेल्या 100 मेंढ्यापैकी 10 मेंढ्याच परत केल्याचा जाब विचारल्यावरून बेदम मारहाण करण्यात आली पुढील तपास पोहेकॉ कुंदन पवार करीत आहे.