मालेगाव: मालेगावात गव्हाचे वाटप पुन्हा सुरू करण्याची शिधापत्रिकाधारकांची मागणी
मालेगाव तालुक्यातील गरीब लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांतून गव्हाचे वाटप बंद असल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे गव्हाची खरेदी करणे कठीण झाले असून, दिवाळीपूर्वी 'आनंदाचा शिधा' मिळेल का, असा सवाल उभा आहे.