नाशिक: सातपूर गावात एकाला मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न बनाव असल्याचे स्पष्ट; पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची माहिती
Nashik, Nashik | Oct 17, 2025 सातपूर गावात एकाला धारदार कोयत्याने मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.सर्वच प्रसारमाध्यमांवर या प्रकरणी बातम्या प्रसारित करण्यात आल्या परंतु सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी माहिती दिली.चंद्रेश शंकर विश्वकर्मा हा व त्याचे मित्र अमरधाम सातपूर गाव येथे दारू पीत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला व त्याला लोंढे यांच्या मुलांनी मारहाण केली अशी खोटी माहिती दिली. हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.