जालना: माहूरगड येथे रेणुका मातीचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतले विधिवत दर्शन
Jalna, Jalna | Oct 9, 2026 आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे असलेल्या रेणुका मातेचे विधिवत दर्शन घेतले आहे, याप्रसंगी त्यांनी या दुःखात व या दुष्काळाच्या सावटातून या सर्व शेतकऱ्यांना तारण्यासाठी शक्ती मिळो अशी प्रार्थना रेणुका मातेच्या चरणी करत विधिवत रेणुका मातेचे पूजन केले आहे ,याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते.