पुर्णा: पूर्णा तहसील भूमी अभिलेख कार्यालयात लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई
पूर्णा तहसील भूमी अभिलेख कार्यालयात वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांवर तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी नोटीस बजावली आहे. सोमवारी सकाळी अचानक पाहणी करत गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवण्यास सांगण्यात आले. कार्यालयात खळबळीची परिस्थिती निर्माण झाली आहे.