नगर: आमदार संग्राम जगताप यांचे फोटो असलेला आकाश कंदील अहिल्यानगर च्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहे
अहिल्या नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गात त्यांचा चाहता झाला आहे राजकीय आरोप होत असले तरी अहिल्या नगरकर त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र पाहायला मिळते दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या आकाश कंदीलामध्ये आमदार संग्राम जगताप यांचा फोटो असलेला आकाश कंदील देखील विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत आहे