रुग्णांची आस्थेने विचारपूस; औंध जिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांची भेट
21.5k views | Maharashtra, India | Jul 4, 2026 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, उपचार व्यवस्था आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता याबाबत माहिती घेतली. याप्रसंगी आमदार शंकर जगताप आणि आरोग्य सेवा आयुक्त श्री. संजय काटकर उपस्थित होते.