समुद्रपूर: मुसळधार पावसामुळे मंगरुळ गावाशेजारी असलेल्या नदीला पुर, गावाचा संपर्क तुटला
समुद्रपुर तालुक्यात शुक्रवारी रात्री पाऊस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले असून तालुक्यातील मंगरूळ गावा शेजारी असलेल्या नदिला पुर आल्याने नदी परीसरात असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहे.सकाळी ८ वाजेपासून नदीला पूर असल्याने मंगरूळ गावा इतर गावाशी संपर्क तुटला आहे. तरी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस पडत असल्याने नदी नाल्या गाठावरील नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.