समुद्रपूर: जाम येथिल फकिरवाडी येथिल रसत्याची दुरुस्ती करण्याची शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची मागणी
जाम मधील फकीरवाडी या गावातील नागरिकांना रस्त्याच्या व पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात शिरताच रस्तास दिसेनासे होत आहे.अशातच येथील जनतेनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची भेट घेतली आणि सर्व आपबिती सांगितली. अतुल वांदिले यांनी गुरुवारी ४ वाजता फकिरवाडी येथे जाऊन येथील लोकांचा समस्या जाणून घेतल्या या गावात थोडासा जरी पाऊस आला की लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून रस्ता पूर्ण बंद होऊन जातो.तरी रसत्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी अतुल वांदिले यांनी प्रशासनाकडे केली आहे.