समुद्रपूर: मांडगाव येथील लेंडीनाल्याला पुर:पुराच्या पाण्यामुळे ७०० लोक वस्तीचा संपर्क काहीकाळ तुटला
मांडगाव परीसरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने व मांडगाव पेठ दरम्यान असलेला पूल पाण्याखाली गेला आहे मांडगाव येथे पेठ व गावाला जोडणारा १ छोटा पूल आहे तो २६ वर्षापूर्वी बनला होता आता लेंडीनाला बुजल्याने त्याची उंची पुन्हा कमी झाली त्याला सुरक्षा कठडे सुद्धा नाही सकाळी परिसरात पाऊस सुरू झाला आणि १ ते २ तासात च हा पूल पाण्याखाली गेला ,सकाळपाळीचेशाळकरी मुले अडकून पडले तर दुपारपाळी च्या विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजात जाता आले नाही