समुद्रपूर: जाम येथिल शासकिय जागेवर वैद्यकिय महाविद्यालय घेण्याची आमदार कुणावार यांच्याकडे संघर्ष समितीची मागणी
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभे करीता मंजुर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जाम येथील महाराष्ट शासनाची कृषी विभागाच्या अखत्यारीत असणारी सर्व्हे नंबर ३२० आराजी २० हेक्टर हे.३२ आर. जमीनीवर उभे करावे अशी मागणी तालुका वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी २ वाजता आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.