कल्याण: भाच्याने केला मामाचा खून, कल्याणच्या मोहने येथील घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
Kalyan, Thane | Oct 31, 2025 कल्याणच्या मोहने परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामा भाचे मुंबईच्या गोरेगाव येथे राहत होते मात्र भाचीच्या डिलिव्हरीसाठी कल्याणच्या मोहने येथे दोघे आले होते. यावेळी रुग्णालय परिसरात दोघांचा वाद झाला आणि रागाच्या भरात गणेश पुजारी नावाच्या भाच्याने मनीअप्पा नायर नावाच्या मामाची रुग्णालयाच्या शिडीवर डोके अजून हत्या केली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अवघ्या एका तासाच्या आत खडकपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.