सेलू: दबाव तंत्राचा वापर करून आमदारांनी अपूर्णावस्थेत असलेल्या आरोग्य केंद्राचे उरकवले उदघाटन: माजी जिल्हा परिषद सदस्य रणनवरे
Seloo, Wardha | Oct 11, 2024 आमदारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपूर्णावस्थेत असलेल्या हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन उरकवल्याने हिंगणी परिसरातील 23 गावांच्या आरोग्य सेवेचा पार बट्टयाबोळ झाला आहे. या श्रेयवादाच्या लगीनघाईत आमरण उपोषण कर्त्यांनाही डावलून त्यांचा देखील अपमान केला. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे यांनी ता. 11 शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता सेलूच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केला.