रोहा तालुक्यातील नागोठणे येथील साडेचारशे वर्षांपूर्वीचा जुना पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे स्थानिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर आता हा पूल 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. पूर्वीच्या काळी याच पुलावरून लालपरी धावत होती असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोह्याकडून नागोठणेकडे जाण्यासाठी हा मार्ग होता. मात्र हा पूल धोकादायक स्थितीत असल्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.