हिंगणघाट: रिंमडोह परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या केली अटक, १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील रींमडोह परीसरात पोलिसांनी नाकाबंदी करून मोपेड क्रमांक MH 32 AQ9414 वर अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.हि कारवाई हि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार देवेद्र ठाकुर, यांचे आदेशाने पोलीस डि.बी. पथकाचे प्रशांत ठोंबरे सह पोलिसांनी केली आहे.