हिंगणघाट: मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिका परिसरात आमदार कुणावार यांच्या हस्ते सभागृहाच्या बांधकामासाठी भूमिपूजन
हिंगणघाट येथे स्थानिक विकास कार्यक्रम- २०२५-२६ अंतर्गत शास्त्री वार्डमधील मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिका परिसरात शासकीय जागेवर प्रस्तावित सभागृहाच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे,विलास नरवटे, आदिसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आणि परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.यावेळी आमदार समिर कुणावार मार्गदर्शन केले.