अंबड पोलिसांनी घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत २१ लाख ७८ हजार रुपये किमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. आरोपी महेश रमेश पिंगळे (वय ३७, रा. वरचे चुचांळे) याला अटक करून चौकशी केली असता, त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या एकूण पाच घरफोड्यांची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीकडून १८६.०६० ग्रॅम सोने आणि १७०.३३० ग्रॅम चांदी असा एकूण २१,७८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक,यांच्या आदेशाने झाली.