नागपूर ग्रामीण: बहादुरात पाणी बिलांच्या मुद्यावरून विदर्भ राज्य आंदोलन समिती चे आक्रमक 'मटका फोड' आंदोलन
नगरपंचायतीचा अनियमित पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि अवाजवी पाणी बिलांच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीने बहादुरात तीव्र 'मटका फोड' आंदोलन केले. नागपूर शहरापेक्षाही जास्त पाण्याचे दर आकारल्यामुळे नागरिकांची बिले लाखांच्या घरात गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून निषेध नोंदवला.