बुलढाणा: झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोगाला जागे करणे कठीण - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
झोपी गेलेला माणसाला जागे करणे सोपे आहे परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोगाला जागे करणे कठीण काम आहे.पुरावे दिल्यानंतर देखील निवडणूक आयोग तांत्रिक घोटाळा मान्य करत नाही.असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.