लातूर : लातूर शहर महानगरपालिकेने गाळेधारकांना मोठा दिलासा देत 8 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मनपा मालकीचे तसेच बी ओ टी तत्वावरील गाळेधारकांसाठी थकित भाड्यावरच्या व्याजात तब्बल 100% सूट जाहीर केली आहे. शहरातील अनेक गाळ्यांचे भाडे दीर्घकाळापासून थकीत असून, मनपाच्या वसुली प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि गाळेधारकांना भाडे भरण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही विशेष सवलत योजना लागू करण्यात आली आहे.