नागपूर ग्रामीण: डायल ११२ वर खोटी माहिती देणे पडले महागात; बुटीबोरीत इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
आपत्कालीन सेवा असलेल्या 'डायल ११२' क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित पद्माकर लोखंडे असे आरोपीचे नाव आहे. २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास डायल ११२ च्या कंट्रोल रूमला एका कॉलरकडून अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती मिळाली. बुटीबोरी येथील दुर्गा माता पाण्याच्या टाकीजवळ भावाने कॉलरला चॉकुने मारहाण केली.