कोरची: आरोग्य विभागाचा वतीने कोरची येथील शाळेत मलेरिया आजारा विषयी जनजागृती कार्यक्रम
तालुक्यात मलेरियाचा प्रकोप वाढलेला आहे नूकताच टेमली येथील एका वृद्धाचा मलेरियाने मृत्यु झाला आहे सदर समस्येची दखल घेत दि.३१ जूलै गूरूवार रोजी दूपारी ३ वाजता तालुका आरोग्य विभागाचा वतीने कोरची येथील पारबताबाई विद्यालयात जनजागृति शिबीराचे आयोजन केले होते.शिबीरात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्या मार्गदर्शनात कीटक शास्त्रज्ञ डॉ. लंकेश भैसारे यांनी विद्यार्थ्यांना मलेरिया विषयी मार्गदर्शन केले.