कर्नाळ पदमाळे रस्त्याच्या कामास आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ
Miraj, Sangli | Sep 18, 2024 करणार पद्माळे या दोन कोटी दोन लाख रुपये निधीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी पद्माळे गावचे सरपंच एकनाथ कोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील अभिजीत जगदाळे विलास पाटील बंडू गुरव माजी सरपंच सचिन जगदाळे तर करणार मधील सरपंच संध्या कांबळे केशव पाटील विकास पाटील राजाराम मिसाळ चंद्रकांत पाटील किरण मगदूम पांडुरंग मगदूम मधुकर पाटील ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवरांसह दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते