हिंगणघाट: शहरातील मार्केट यार्ड परीसरात पोलिसांची सट्टापटीवर धाड
हिंगणघाट शहरातील मार्केट यार्ड परीसरात पोलिसांची सट्टापटीवर धाड टाकून १०७० रुपये नगदी व सट्टापटी लिहण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार शहरातील मार्केट यार्ड परीसरात सट्टापटी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून १०७० रुपये नगदी व सट्टापटी लिहण्याचे साहित्य जप्त यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.