हिंगणघाट: धोबी घाट रस्तवर पोलिसांची अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई:१०० लिटर गावठी मोहा दारू व मोपेड जप्त
हिंगणघाट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोबी घाट रस्त्यावर पोलिसांनी अवैध गावठी मोहा दारू विरोधात कारवाई करीत १०० लिटर गावठी मोहा दारूसह मोपेड जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांना मोपेड गाडी क्रमांक MH-32-AR-9574 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करुन धोबी घाट रोडने गाडगेबाबा वार्ड येथे जात आहे.अशी माहीती झाल्याने अशा प्राप्त माहीती वरून पोलीस कर्मचारी सुनिल मळनकर,विनोद येवले.सुशिल सायरे,.रविद्र आडे यांनी धोबी घाट गाडगेबाबा वार्ड रोडवर नाकेबंदी करून कारवाई केली आहे.